आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतसंस्थेच्या संचालकाची अात्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जोगेश्वरी महिला बहुउद्देशीय संस्था वेणुस्वामी समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे युवा व्यवस्थापक गौरव श्रीकांत तावरे (वय २५) यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. मुखर्जी बंगल्याजवळ तावरे यांचे निवासस्थान आहे.
त्यांच्या निवासस्थानामध्ये त्यांनी मंगळवारी दुपारी वाजताच्या सुमारास छताला गळफास घेतला. तासाभरानंतर गौरव लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सिव्हिल लाइन्स पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पतसंस्था तोट्यात आल्यामुळे गौरव तावरे हे नैराश्यात आले असावे, अशी चर्चा सुरू होती.