आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यापुढे कुठल्याही गुन्ह्यात सापडलात तर याद राखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सराईत गुन्हेगार म्हणून तुमचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. यापुढे कुठल्या गुन्ह्यात सापडलात तर याद राखा, अशी तंबी शहरातील १६३ गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दिली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने शहरातील १५ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना मंगळवारी आयुक्तालयातील अलंकार सभागृहात सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळपर्यंत बसून ठेवत गुन्हे करू नये, असे बजावण्यात आले.
गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहावा यासाठी ही कारवाई करण्यात आली. चार दिवसांपूर्वी नक्षत्रवाडी येथे २४ लाखांचा दरोडा पडला. यातील दरोडेखोरांना पकडण्याठी पोलिसांचे चार ते पाच पथक कार्यरत आहेत. शहरातील सराईत गुन्हेगारांच्या चौकशीतून काही धागेदोरे मिळता आहेत का याची चाचपणी करण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यात आले. १५ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने सोमवारी रात्री मंगळसूत्र चोरी, मोटारसायकल चोरी हाणामाऱ्या, घरफोडी, लूटमार, खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोडा आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांना पोलिस आयुक्तांसमोर हजर केले. या गुन्हेगारांनी गेल्या तीन महिन्यांत काय केले, आता हे काय करत आहेत याची संपूर्ण माहिती काढण्यात आली आहे. या आरोपींच्या हाताचे ठसेही या वेळी घेण्यात आले.
पोलिसांना माहिती द्या
गुन्हेगारीचा मार्ग सोडून योग्य त्या मार्गाने आपले जीवन जगा, एक जागरूक नागरिक होऊन शहरात घडणाऱ्या घटनांची पोलिसांना माहिती द्या, असे बजावण्यात आले. सोमवारी अचानकपणे धाड मारून पोलिसांनी असेल त्या परिस्थितीत या गुन्हेगारांना हजर केले होते. त्यामुळे अनेक गुन्हेगारांच्या नातेवाइकांनी आयुक्तालयात गर्दी केली होती.