आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CriME DiaRY : जेव्हा अंनिस कार्यकर्त्याच्या शरीरात येते भूत, खूनाचे रहस्य उलगडते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेस गाव. लोकसंख्या पाच हजारांच्या घरात. पायाभुत सुविधांची वानवा. शिक्षित डोक्यांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी. शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. पाच-दहा वर्षांपूर्वी गावाला असाध्य अशा रोगाने ग्रासले होते. यावेळी माणसं अगदी उंदरासारखी पटापटा मेली. प्रत्येक घरी वाईट बातमी. सर्वत्र हाहाकार. यावेळी एक मांत्रिक गावात आला. त्याने चमत्कार करुन गावकऱ्यांचा विश्वास संपादित केला. गावातील भूत-बाधा दूर केल्याचा दावा केला. गावातील भोळी-भाबळी जनता त्याच्या दाव्याला बळी पडली.
प्रत्येक अमावस्येला या मांत्रिकाच्या शरीरात भूत येते. गावातील बाळू नावाच्या व्यक्तीचे भूत. बाळू तसा गावातील वेडा. जिवंत असताना त्याला काडीची किंमत नव्हती. कुणी दिलेली भाकरी खावून जगणारा, मिळेल त्या जागी झोपणारा. अंगावर असलेल्या मळकट कपड्यांच्या चिंध्या झालेल्या. यापूर्वी कधी केस विंचरले असतील, अशा प्रश्नात पाडणारा. त्याचा इतिहासही मोठा रंजक होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. पण असाध्य रोगाने आई-वडील दगावले. काकाने जमिन-घर बळकावून घेतले. काका त्याला दररोज बेदम मारायला. अखेर तो वेडा झाला. काकाने घरातून हाकलून लावले. त्यानंतर अवघ्या गावालाच त्याने घर केले.
एक दिवस बाळूचा मृतदेह गावातल्या विहिरीजवळ सापडला. तो कशाने मेला हे काही कळेना. मांत्रिकाने मृतदेह तपासला. बाळूचा मृत्यू अनैसर्गिक आहे. यापूढे बाळूचा आत्मा या गावात भटकत राहील. त्याला वेळोवेळी शांत करणे, हेच आपल्या हातात आहे. त्याला कायमचे पळवून लावता येणार नाही, असे पटवून दिले. गावकऱ्यांचा मांत्रिकावर खूप विश्वास होता. त्यांनी ती बाब स्वीकारली. मुळात बाळूच्या गळ्यावर खाणाखुणा होत्या. त्याकडे दुर्लक्ष करीत मांत्रिकावर विश्वास दाखवला.
अशाच एका अमावस्येला बाळूचे भूत मांत्रिकाच्या शरीरात आले. मांत्रिकाभोवती गावकरी जमा झाले. डोळे बंद करुन मांत्रिक काहीतरी पूटपूट लागला. वेडेवाकडे हावभाव करु लागला. मांत्रिकाने डोळे बंद केल्याने गावकऱ्यांनीही डोळे बंद केले. त्याच्यासमोर हात जोडून उभे राहिले. परंतु, यावेळी जोरदार आवाज झाला. गावकऱ्यांनी खाडकन डोळे उघडले तर काय... गावच्या सरपंच्यांच्या पोटात चाकू... भळाभळा रक्त वाहत होते. जरा वेळात सरपंच गतप्राण झाले. सरपंच्यांचा कुणी खून केला असेल, असा प्रश्न मनामनांत उमटला. विशेष म्हणजे यावेळी रक्ताळलेला चाकू पोलिस पाटलांच्या हातात होता. पाटील आणि सरपंच यांचे पक्के वैर. पोलिस पाटलांनीच सरपंच्यांच्या खून केला, असा गावकऱ्यांचा समज झाला.
पुढील स्लाईडवर वाचा, कुणी केला सरपंच्यांचा खून....मांत्रिकाने... पोलिस पाटलाने, की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने...