आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा शिक्षक कारायचा विद्यार्थिनींबरोबर अश्लील चाळे, वृद्धेने केला \'पर्दाफाश\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर- अंबाजोगाई तालुक्यातील आणि धारूर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केंद्रेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनंत गायकवाड याने तिसरीतील मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार पालकांच्या जागरूकतेने गुरुवारी समोर आल्यानंतर त्याच्यावर धारूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गायकवाडच्या कुकर्माच्या कहाण्या समोर येत असून दीड वर्षापासून अनंत गायकवाड विद्यार्थिनींबरोबर अश्लील चाळे करत असल्याची माहिती समोर आली अाहे. याच प्रकारामुळे मुख्याध्यापकाने दोन दिवसांपूर्वीच त्याला समज दिली होती हे विशेष !

पहिली ते आठवीपर्यंतच्या केंद्रेवाडी जिल्हा परिषद शाळेत १५७ विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. अनंत गायकवाड हा शिक्षक नऊ वर्षांपासून कार्यरत आहे. मागील दीड वर्षापासून गायकवाड हा पहिली ते तिसरीपर्यंतच्या अनेक मुलींबरोबर अश्लील चाळे करत असल्याची चर्चा शाळेत सुरू होती, परंतु थेट गायकवाड याला समज देण्याची हिंमत तेव्हा शाळा प्रशासनाने दाखवली नाही की शाळेतील शिक्षकाकडून असा प्रकार होत असल्याचेही तेव्हा शाळा प्रशासनाने वरिष्ठांना कळवले नाही. त्यामुळे गायकवाडचे फावले आणि दिवसेंदिवस हा प्रकार वाढत गेला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, वृद्धेनेके कसा केला 'परदाफाश'...
-पाच दिवसांची कोठडी
बातम्या आणखी आहेत...