आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्याची लाख ८८ हजारांची बॅग पळवली; सातारा परिसरातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोंढ्यातील व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिकीमधून लाख ८८ हजार रुपयांची बॅग लांबवण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री वाजेच्या सुमारास साताऱ्यामधील अथर्व राॅयल सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. इंदर पगारिया मोंढ्यातील रवा-मैद्याचे व्यापारी आहेत. सोमवारी रात्री दुकान बंद करून ते घराकडे निघाले. त्यांनी लाख ८८ हजार रुपये दुचाकीच्या डिकीत ठेवले होते.
पगारिया एवढी मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती चोरट्यांना असावी. त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांनी बॅग लांबवल्याचा संशय पोलिसांना आहे. पगारिया यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावली आणि घराकडे निघाले असता विनाक्रमांकाच्या पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यांना या दोन भामट्यांनी बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान, अन्य दोघांनी त्यांच्या दुचाकीची डिकी स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने उघडली आणि बॅग पळवली. भामट्यांशी बोलून झाल्यानंतर पगारिया पैसे काढण्यासाठी दुचाकीजवळ जाताच बॅग लांबवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पगारिया यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सोसायटीतील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर चोरटे त्यात कैद असल्याचे दिसून आले. तपास सहायक फौजदार एस. बी. सानप करत आहेत.