आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्मा हत्या प्रकरण;सलीम अली सरोवरातून रिव्हॉल्व्हर जप्त, आरोपींना ३० पर्यंत कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- व्यावसायिक अनिल शर्मा यांच्या हत्येसाठी वापरलेले रिव्हॉल्व्हर व ३१ जिवंत काडतुसे सलीम अली सरोवरातील पाण्यातून जप्त करण्यात सोमवारी पोलिसांना यश आले. या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या पाचही आरोपींना गंगापूर न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अनिल शर्मा यांच्या हत्येनंतर पोलिसांनी प्रमुख आरोपी संतोष मोरे व त्याचा साथीदार बापू जगताप यांना लगेच अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यात त्यांना साथ देणारे अन्य तीन जण फरार झाले होते. त्या तिघांना २४ रोजी गंगापूर पोलिसांनी सुदाम एकनाथ खंडागळे, महेश मारुती कडणे, दीपक माधव मोरे या तीन आरोपींना अटक केली होती.

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर सलीम अली सरोवरातील पाण्यामध्ये फेकले होते.