आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या विक्रीचे रॅकेट उघड, बदनापूर पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सय्यद नजाकत / बदनापूर - बदनापूर तालुक्यातील देवगाव तांडा येथील गायब झालेली ३० वर्षीय महिला शुक्रवारी गुजरातमध्ये सापडल्यानंतर नोकरीचे आमिष दाखवून महिलांची विवाहासाठी विक्री करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी औरंगाबादेतील एका महिलेसह तीन आरोपींना अटक केली. विकलेल्या महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हरीश गोंडलिया, प्रकाश वाढेल (३५ रा. ता. कोंडालिया, जि. गिर, गुजरात) आणि शकीला अन्वर सय्यद (रा. गारखेडा, औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

१९ जानेवारी रोजी (रेश्मा नाव बदलेले आहे) शकीलासोबत घराबाहेर पडली होती. मात्र, तीन दिवस झाले तरी ती घरी परतली नाही. तिचा मोबाइलही बंद होता. त्यामुळे घरातील कुटंुबीयांना शंका आली. आणि रेश्माच्या भाच्याने बदनापूर पोलिस ठाण्यात २५ जानेवारी रोजी शकीलाने अपहरण केल्याची तक्रार दिली. त्यानुसार तपासाची चक्रे फिरल्यानंतर हे धक्कादायक सत्य समोर आले. शकीलानेच टोळीतील साथीदार प्रकाशच्या मदतीने तिला हरीश गोंडलिया या हिऱ्याच्या कारखान्यात पैलू पाडण्याचे काम करणाऱ्या कामगाराला १ लाख २० हजारात विकले. त्यातील ८० हजार शकीला तर ४० हजार प्रकाशने घेतले, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. शकीलाने रेश्मा अविवाहित असल्याचे हरीशला सांगितले होते. मात्र, विवाह झाल्यावर रेश्माने त्याला ती विवाहित असून तीन मुले असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने रेश्माच्या घरच्यांना फोन करुन माझे पैसे द्या आणि तुमच्या मुलीला परत घेऊन जा असे सांगितले. ही माहिती तिच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली. बदनापूर पोलिसांनी रेश्माच्या नातेवाइकांना पैसे देण्याचे नाटक रचण्यास सांगितले.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, हवालदार सुभाष चव्हाण आत्माराम अंभोरे, पूजा डाखोरकर आणि पीडित महिलेच्या भाच्याने गुजरातमधील सोमनाथ गिरजवळील कोंडालिया तालुक्यातील फचरिया गाव गाठले आणि पीडित महिला आणि आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपअधीक्षक दीक्षित गेडाम, पोलिस निरीक्षक रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भाच्यांनी घेतला पुढाकार : रेश्माची आई लहानपणीच गेली. वडील काही वर्षांपूर्वी वारले. आता तिला केवळ एक भाऊ, भावाचा मुलगा होता आणि तीन मुले होती. त्यांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न होता. त्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती आणि त्याचाच फायदा आरोपींनी उचलला. तिला परत आणण्यासाठी भाच्याने पूर्ण प्रयत्न केले पोलिसांनीही वेगात यंत्रणा हलवली. ज्या वेळी शुक्रवारी सायंकाळी रेश्मा बदनापूरला परत पोहोचली तेव्हा तिची पाच वर्षांची मुलगी गळ्यात पडली आणि दोघांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मुलीच्या आडून केली मुस्कट दाबी...
-काय म्हणाले पोलिस निरीक्षक...