आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' नोटिसा गायब; तहसीलदारांची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - गोदावरी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारी वाहने पकडल्यानंतर त्यावर दंडात्मक कारवाई न करता वाळू तस्कराची आर्थिक तडजोड करून सोडून देण्यात आली होती. त्यामुळे प्रभारी तहसीलदारांनी मागील आठवड्यात महिला नायब तहसीलदारांसह दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या, परंतु त्या त्यांच्या हाती पडण्याअगोदरच कार्यालयातून गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याची कबुली खुद्द तहसीलदारांनी मंगळवारी दिली.
दरम्यान, अवैध वाळू उपसा प्रकाराला आळा घालण्याबरोबरच वाळू तस्करांशी आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी काढलेल्या कारणे दाखवा नोटिसा गायब करण्याचे धाडस कार्यालयातून होत असल्याच्या गंभीर प्रकाराने तहसीलदार चक्रावून गेले आहेत. नदीपात्रातील अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी खासगी वाहनांनी गेलेल्या महिला नायब तहसीलदार चैताली दराडे व दोन कर्मचाऱ्यांनी एक वाहन पकडण्याची कामगिरी बजावली. पण कारवाई न करता वाहन सोडून दिले होते.

तहसीलदारांनी स्वत: बजावल्या नोटिसा
अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने सोडल्या प्रकरणात काढण्यात आलेल्या नोटिसा संबंधितांपर्यंत पोहोचल्या नाही. प्रभारी तहसीलदार बेलसरेंनी आपल्याकडील नोटिसीची प्रत अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावून तालीम केल्याचे सांगितले.