आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोमांसाची तस्करी करणारी टोळी जेरबंद, चौदा क्विंटल मांसासह सात जणांना घेतले ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोमांस तस्करी करणाऱ्या आरोपींसोबत एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू इतर कर्मचारी.
यवतमाळ- प्रतिबंध असताना गोमांसाची तस्करी करणाऱ्या सात जणांना एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई एससीबी पथकाने रविवार दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील पांढरकवडा मार्गावरील मालानी बाग परिसरात करण्यात आली. या कारवाईमध्ये वाहन चालक हमजाबीन हसन चाऊस वय ४९ वर्ष रा. ईस्लामपूरा, आसिफ अब्दुल कादर कुरेशी वय ३५ वर्ष रा. कुरेशीपूरा, अब्दुल समीर अब्दुल असिफ कुरेशी वय १९ वर्ष रा. कुरेशीपूरा, मो. साजिद मो. शमीन वय २२ वर्ष रा. कुरेशीपूरा, जीगर अली वाहब अली वय १९ वर्ष रा. अशोक नगर, रज्जाक गुलाब कुरेशी वय ३० वर्ष रा. अशोक नगर आणखी एका बालकाला पथकाने ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी सविस्तर असे की, महाराष्ट्रात गोमांस विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. तरी सुद्धा अनेक ठिकाणी गोमांस विक्री होत आहे. मात्र, गोमांस तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास गो मांसाने भरलेले बोलेरो वाहन पांढरकवडा मार्गावरील मालानी बाग परिसरात उभे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून पथकाने घटनास्थळ गाठून त्या वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनात तब्बल चौदा क्विंटल गोमांस आढळून आले. दरम्यान पथकाने या प्रकरणी सात तस्करांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून दोन दुचाकी, बोलेरा वाहन, चौदा क्विंटल गो मांस असा एकूण सात लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहासक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर कडू, जमादार ऋषी ठाकुर, संजय दुबे, प्रदीप नाईकवाडे, किरण पडघण, गजानन अजमीरे, आशीष भूसारे, ममता देवतळे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणी वडगावरोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास एलसीबी करत आहे.