आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला उड्डाणपुलावरून फेकल्याप्रकरणी फरार आरोपी गुड्डू गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तरुणाला उड्डाणपुलावरून खाली फेकणाऱ्या फरार आरोपीला शेख जमीर ऊर्फ गुड्डू शेख गनी (२९, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर) याला बेगमपुरा पोलिसांनी गुरुवारी रात्री दहा वाजता अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फेब्रुवारी रोजी रात्री पैशाच्या वादातून सोहेल बावजीर याला बेदम मारहाण करत आणि शेख कलीम याला पाच ते सहा जणांनी टाऊन हॉल उड्डाणपुलावरून खाली फेकले होते.यात कलीम हा गंभीर जखमी झालेला आहे. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या प्रकरणात एका पक्षाचा राजकीय कार्यकर्ता असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली होती. पोलिस निरीक्षक शेख सलीम यांच्या तडकाफडकी बदलीनंतर पुढील तपास बेगमपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे यांच्यासह उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे करीत आहेत. गुरुवारी रात्री माहिती मिळाल्यावरून जमीर ऊर्फ गुड्डू याला चिकलठाणा परिसरातील काळे बंधूच्या हॉटेलसमोरून बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्याचे साथीदार लतीफ, वसीम आणि लतीफचा भावजी अजूनही पसार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...