आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: गुंगीचे औषध देऊन करायचा बलात्कार, अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुकुंदवाडी परिसरातील एका २४ वर्षीय तरुणीचे लग्न मोडण्यासाठी तिच्या भावी पतीस मोबाइलवर मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या तसेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत बलात्कार करणाऱ्या आरोपीस मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. न्यायालयाने त्याला मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे पीडित मुलगी उच्चशिक्षित आहे. 

आरोपीने तरुणीच्या भावी पतीला मेसेज पाठवून तिच्या चारित्र्याविषयी त्याच्या मनात गैरसमज निर्माण केला होता. यामुळे वैतागलेल्या या तरुणीने अखेर मुकुंदवाडी ठाणे गाठून लग्न मोडणारा आरोपी दीपक जुंजाजी आघाव (२४, रा. एन-२, ठाकरेनगर) याच्याविरुद्ध तक्रार दिली. आरोपीने २०१३ पासून मोबाइलमध्ये काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला. फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत गैरफायदा घेतल्याचे तक्रारीत म्हटले असून आरोपीने या सर्व प्रकारात पीडितच जबाबदार असल्याचे पत्र लिहून घेतले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. 

यावरून आरोपी दीपक आघाव याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, एन, ३२८, ५०६, ३२३ नुसार २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते यांच्या पथकाने त्याला शनिवारी रात्री अटक केली. आरोपी दीपक आघावला रविवारी न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील अाशिष दळे यांनी त्याला पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी त्याला मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 
बातम्या आणखी आहेत...