आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन भासरे-जावांनी केला भावसूनेचा खून, चार अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय विवाहितेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात हा खून असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीच एपीआय नागेश चतरकर हे पथकासह अटाळीच्या दिशेने रवाना झाले. गुरुवारी पहाटे पोलिसांनी या चौघांनाही अटाळीवरून ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या चौघांनाही दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश चतरकर, एएसआय अरुण मेटे, मुलचंद भांबुरकर, सचिन मिश्रा, बाबा ठाकरे यांनी केली आहे.
नूरजहाँ शेख जिब्राईल (२६ रा. पिंजारीपूरा, धामणगाव रेल्वे) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. याचवेळी पोलिसांनी शेख इस्राईल शेख सत्तार (४२), शेख मेहबूब शेख सत्तार (४५) या दोघांसह दोन महिलांना खुनाच्या आरोपात पकडले आहे. नूरजहाँ यांचे पती शेख जिब्राईल यांचे भाऊ शेख इस्राईल, शेख मेहबूब आणि शेख अय्यूब हे तिघे सख्खे भाऊ आहेत. या चार भावंडांचे मागील काही दिवसांपासून घराच्या जागेवरून वाद सुरू होते. दरम्यान २७ डिसेंबरला दुपारी नूरजहाँ त्यांच्या वर्षांच्या मुलीसह घरात होत्या. तर त्यांचे पती जिब्राईल हे ट्रकचालक असल्यामुळे हैद्राबादला गेले होते. २७ डिसेंबरला दुपारी नूरजहाँ यांच्या शेजारी राहणारी एक मुलगी त्यांच्या घरात गेली. त्यावेळी नूरजहाँ निपचित पडल्या होत्या. तिने परिसरातील नागरिकांना सांगताच तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गावकऱ्यांनी ही माहीती जिब्राईलला दिली. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, २८ डिसेंबरला पोलिसांना वैद्यकिय यंत्रणेकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नूरजहाँ यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धामणगावात जावून माहिती घेतली असता या कुटुंबीयांना घरगुती वाद होता. तसेच पत्नीचा खून दोन भाऊ त्यांच्या पत्नींनी केले असल्याचा आरोप नूरजहाँचे पती जिब्राईल यांनी केला होता.