आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापिकेचा विनयभंग; प्राध्यापकावर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - सावंगी जिल्हा परिषद शाळेसमोर औरंगाबाद येथील कला वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुरू आहे. या शिबिरात प्राध्यापक, प्राध्यापिका व 50 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने एका प्राध्यापिकेचा विनयभंग केला. याप्रकरणी फुलंब्री पोलिसांत प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सावंगी (हर्सूल) येथे 24 फेब्रुवारीपासून एन-11, सिडको येथील कला वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुरू आहे. 24 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर मंगळवार, 25 रोजी सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थी सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर आले व पुढील कामाचे नियोजन करत असताना याच महाविद्यालयातील प्राध्यापक अभिजित पिलखाने यांनी प्राध्यापिकेचा विनयभंग केला.