आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपजिल्हाधिकार्‍याच्या पत्नीने पोलिसाच्या श्रीमुखात लगावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - भद्रा मारुती मंदिर परिसरामध्ये उपजिल्हाधिकार्‍यांच्या पत्नीने थेट पोलिस कर्मचार्‍याच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना शनिवारी घडली. शनी अमावास्येनिमित्त जालन्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके हे सपत्नीक दुपारी भद्रा मारुती दर्शनासाठी आले होते. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शनिमंदिरात दर्शन करून ते आत जाण्याच्या दरवाजातून बाहेर येत असता तेथे तैनात असलेले पोलिस कर्मचारी रमेश पायघन यांनी त्यांना हटकले. यामुळे कटके यांच्या पत्नी व पोलिसात वाद झाला आणि त्यांनी पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली. अखेर उपजिल्हाधिकार्‍यांनी पत्नीला शांत करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पायघन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.