आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटी मािगतले; ३० लाख घ्यायला आला अन् अडकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ठेकेदारामार्फतज्या कंपनीत काही दिवसांपूवी साफसफाईचे काम करीत होता त्याच कंपनीच्या मालकाला धमकावून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा लावून जेरबंद केले. बदनामी टाळण्यासाठी कोटी रुपये मागून ३० लाख रुपयांवर त्याने तडजोड केली होती. रवविारी रात्रीपासून पोलिस त्याच्या मागावर होते.
एमआयडीसी वाळूज येथील ऋचा इंजिनिअरिंग कंपनीचे मालक उमेश दाशरथी यांना बदनाम करू शकेल अशी एक सीडी आपल्याकडे आहे, असे महेश प्रभूअण्णा िचकणकर (२२) याचे म्हणणे होते. ही सीडी नष्ट करण्यासाठी कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्याने उमेश दाशरथी यांचे विश्वासू नागनाथ कराडे यांच्याकडे केली. कराडे यांनी ही माहिती दाशरथी यांना सांिगतली. असे काही असूच शकत नाही, असे सांगत दाशरथी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्याला पकडण्यासाठी त्याला पैसे घ्यायला बोलावण्याचे ठरवण्यात अाले. मात्र, कोटी रुपये द्यायला तयार झाले तर त्याला विश्वास बसणार नाही म्हणून ३० लाख रुपयांत तडजोड करण्याची योजना आखण्यात आली. त्या रकमेवर तो मान्य झाल्यावर रवविारी सापळा रचण्यात आला. मात्र, त्याने आपला खरा थांग लागू दिल्यामुळे त्या दिवशी तो सापडू शकला नाही.

सोमवारी (१८ ऑगस्ट) मात्र पोलिसांनी फेरीवाले, रिक्षा ड्रायव्हर, कंपनीतील कामगार असे वेशांतर करून रात्री नऊ वाजता त्याला जेरबंद केले. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आणि सायबर क्राइमचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी महाराणा प्रताप चौकातील तृप्ती गेस्ट हाऊससमोर ही कारवाई केली.

दाशरथी यांच्या ऋचा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत महेशने आठ महिने कंत्राटदारांमार्फत सफाई कामगार म्हणून काम केले आहे. तो मूळचा वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर या गावचा रहविासी आहे. मात्र, मागील सहा वर्षांपासून तो एमआयडीसी वाळूज येथील पवननगरमध्ये वास्तव्य आहे.

रवविारी दिली होती हुलकावणी
गुन्हेशाखेच्या पोलिसांनी रवविारी (१७ ऑगस्ट) रेल्वेस्टेशन परिसरात दविसभर सापळा रचला होता. हॉटेल प्रेम पॉप्युलर पंजाबमध्ये भामटा मद्य प्राशन करत दाशरथी यांना फोनवरून खंडणीची रक्कम मागत होता. त्या वेळी काॅल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात येत होते. मात्र, गर्दी जास्त असल्यामुळे आणि खंडणीखोराला संशय आल्यामुळे येथील ‘ट्रॅप’ यशस्वी होऊ शकला नव्हता; परंतु सोमवारी तो अलगद जाळ्यात अडकला. त्याला मंगळवारी सायंकाळी न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांचीकामगिरी वाखाणण्याजोगी
माझे गुपित उघड झाल्यामुळे माझी बदनामी होईल, असे काहीच नसल्यामुळे मी बिनधास्त तक्रार केली. क्राइम ब्रँचच्या टीमचे काम मोलाचे असून गौतम पातारे यांनी तर खूपच चांगले काम केले आहे. आरोपी माझ्या कंपनीत सफाई कामगार म्हणून कामाला होता. त्याने यापूर्वीही इतरांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे. त्यामुळे अशी प्रवृत्ती ठेचणे महत्त्वाचे होते. उमेशदाशरथी, उद्योजक


पैशांसाठी आणली होती पशिवी

गुन्हेशाखेचे सहायक पोलिस आयुक्त किशनसिंग बहुरे यांच्या सल्ल्यानुसार आघाव, पातारे आणि एम. वाळूज ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, फौजदार सुभाष खंडागळे, नसीम खान यांनी परिसरात वेशांतर करून सापळा रचला. सोमवारी संपूर्ण दविस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी परशि्रम केले. दरम्यानच्या काळात सीडीआर तपासण्यात येत होते. रात्री नऊ वाजता आपण आता लखपती होणार या आमिषापोटी महेशने पशिवीही आणली होती; पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन काळ्या रंगाचे कपडे, पशिवी, िमरची पावडर चाकू असे साहित्य हस्तगत केले. जमादार प्रदीप शिंदे, विकास माताडे, धीरज काबलिये, धुडकू खरे, प्रदीप कुटे, प्रभाकर राऊत, प्रकाश काळे, गणेश वैराळकर, रवी खरात, नितीन देशमुख, संदीप क्षीरसागर आणि रवींद्र दाभाडे यांनीही या कारवाईत भाग घेतला.