आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या उच्चशिक्षित महिलेला १५ लाखांचा गंडा, नोकरीचे अमिष दाखऊन लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उच्चशिक्षित महिलेला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून नंतर अटकेची धमकी देत १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या नायजेरियन भामट्यांंना औरंगाबाद गुन्हे शाखेने दिल्लीत अटक केली.

या महिलेची फेसबुकवर जेम्स ड्यूक, गिल पिटरसन यांच्याशी ओळख झाली. व्हॉट‌्सअप चॅटिंग सुरू झाले. मग त्यांनी महिलेला एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या दिल्ली कार्यालयप्रमुखपदी नियुक्त केलेे. त्यानंतर तिला असा मेसेज आला की, दिल्लीतील कार्यालयासाठी विनापरवानगी साहित्य अडीच लाख अमेरिकन डॉलर आले. त्यामुळे तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक केली जाऊ शकते. ते टाळण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात १५ लाख रुपये भरा. घाबरलेल्या त्या महिलेने स्वत:जवळील तसेच नातेवाईकांकडे उसनवारी करून रक्कम भरली. सविस्तर.दिव्य सिटी
बातम्या आणखी आहेत...