आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरट्यांचा कारवर हल्ला, चालकाचे प्रसंगावधान, सर्व रक्कम वाचली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- पेट्रोल पंपावर जमा झालेली १७ लाख ६० हजार रुपयांची रक्कम भरण्यासाठी बँकेत जाण्यापूर्वीच चोराने एका मिनिटात कारमधील दोघांवर कोयत्याने हल्ला करत रक्कम लांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु कारमधील चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने रोकड वाचली. बँकेसमोर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे. परळी शहरातील भवानीनगरात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडलेल्या या सिनेस्टाइल घटनेनेे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

परळी शहरातील भवानीनगरात पालीवाल पॅलेस असून नगर अर्बन को-ऑप. बँकेसमोर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता विठ्ठल सदरे, गोविंद कुलथे हे दोघे कारमधून (एमएच २३ ४५४५) १७ लाख ६० हजार रुपयांची रक्कम बॅगमध्ये घेऊन बँकेत भरण्यासाठी आले. तेव्हा एकाच मिनिटात चोराने काेयत्याने दोघांवर हल्ला केला. हे पाहून कारचालकाने हातातील बॅग सोडता विरुद्ध दिशेने कार पळवली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे १७ लाख ६० हजार रुपयांची लूट टळली आहे. सकाळी साडेदहा वाजता झालेल्या या सिनेस्टाइल हल्ल्याच्या वेळी भवानी चौकात आजूबाजूला पंचवीस विविध प्रकारची दुकाने उघडीच होती. परंतु प्रत्यक्षदर्शी असलेल्या एकानेही घटनेतील चोराचे वर्णन पोलिसांना सांगितले नाही. नगर बँकेच्या कार्यालयातच आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे. बँकेच्या बाहेर मात्र एकही कॅमेरा नसल्याचे समोर आले आहे.

जर बँकेच्या समोर कॅमेरा असता तर कदाचित या कॅमेऱ्यात चोराचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले असते. विशेष म्हणजे घटनास्थळाजवळील एका दवाखान्यात सीसीटीव्ही कॅमेरा आहे, परंतु तो बंद असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. परळी शहरातील गजबजलेल्या भागातील ही थरारक घटना एेकूनच शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दोघातएक गंभीर जखमी
चोरांच्याहल्ल्यात जखमी झालेल्या विठ्ठल सदरे आणि गोविंद कुलथे या दोघांना नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. विठ्ठल सदरे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंद कुलथे यांच्यावर परळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेमुळे आमच्या मनात भीती
पेट्रोलपंपाची रक्कम आम्ही दररोज नगर बँकेत भरणा करतो. तीन दिवस बँकांना सुट्या आल्याने रक्कम मोठी होती. चालकासह तिघा जणांना या रकमेचा भरणा करण्यासाठी पाठवले होते. हल्ल्यात दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत. दिवसा अशी घटना घडल्यामुळे आमच्या मनात भीती निर्माण झाली आहे. -सुहासडुबे, पेट्रोल पंप चालक

सर्वबाजूंनी तपास
घटना घडल्यानंतर माहिती मिळताच तपास यंत्रणा कामाला लागलीे. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करण्यात येणार आहे. -प्रदीपत्रिभुवन, पोलिस निरीक्षक, परळी

बघ्याची भूमिका
चालकानेकार सुरक्षित स्थळी पळवल्यांनतर हल्लेखोर कारच्या विरुद्ध दिशेने कोयता खांद्यावर ठेवून चालत गेला. घटनास्थळानजीक नागरिक फक्त बघ्याच्या भूमिकेत होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, हल्ला झालेली कार..
बातम्या आणखी आहेत...