आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ध्यातील MPSC चा पेपर औरंगाबादेत सोडवला, स्पायकॅमेऱ्याचा केला वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे एमपीएससी परीक्षेत उत्तरे पुरवणारी टोळी गजाआड करण्यात औरंगाबाद शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी विकास मदन राठोड यांनी ही टोळी गजाआड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राठोड यांच्याकडून निवासी डॉक्टर वसतिगृहातील मदन बमनाथ या कारकुनाने २६ ऑगस्टला वैयक्तिक कामासाठी लॅपटाप मागितला. बमनाथने परत केलेला लॅपटॉप राठोड यांनी २८ रोजी उघडला तेव्हा त्यात ई-मेल आणि डेस्कटॉपवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसून आल्या. त्यांनी थेट पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांंनी सायबर शाखेकडे तपास सोपवला. अधिकाऱ्यांनी ई-मेल नेमका कुणी कुणाला केला, याचा शोध घेतला.
पुढील स्लाईडवर वाचा, नेमकी कशी केली चिटींग.... कौटुंबीक प्रकरण की मोठे रॅकेट....
बातम्या आणखी आहेत...