आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र आईला पेटवण्याचा प्रयत्न; मुलगा, पतीवर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- मला नांदवत का नाहीस? असे पतीला विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेचे केस कापून अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न सावत्र मुलानेच केल्याची घटना बीड तालुक्यातील कामखेडा येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील बार्शी नाका परिसरात राहणाऱ्या मसुराबाई या महिलेबराेबर वाहेद गुलाब शेख यांनी २५ वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला होता. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंतही गेले होते. दरम्यान, परस्पर तडजोडीतून त्या वेळी प्रकरण मिटले होते. “मसुराबाई यांना आपण चांगले नांदवू’, असा लेखी जबाब वाहेद यांनी न्यायालयात दिला होता. सहा महिन्यांपासून वाहेद हे मसुराबाई यांच्याकडे येत नसल्याने रविवारी याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या मसुराबाई यांना वाहेद शेख आणि पहिल्या पत्नीचा मुलगा शाहेद शेख याने शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच कात्रीने मसुराबाईंचे केस कापून अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचाही प्रयत्न केला, परंतु आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. याप्रकरणी मसुराबाई यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शाहेद शेख वाहेद शेख यांच्यावर अॅट्राॅसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...