आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमविवाह करणार्‍या जावयाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिशोर - प्रेमविवाह झाल्याने सासरची मंडळी मुलीला नांदवत नव्हती. जावई घर सोडण्यास तयार नसल्याचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी जावयावर कुर्‍हाडीने वार करत खून केल्याची घटना कन्नड तालुक्यातील दिगाव खेडी येथे रविवारी घडली. या घटनेत जावयाचे वडीलदेखील जखमी झाले असून ते औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

सय्यद अजिम ऊर्फ फारूक सय्यद सलीम (25) याने वर्षभरापूर्वी गावातील समाजातील मुलीशी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. त्यामुळे फारूकच्या घरचे सुनेला नांदवत नव्हते. फारूकची पत्नी तीन-चार महिन्यांपासून माहेरी राहत होती. फारूक ट्रकचालक असल्याने तो सतत बाहेर राहत होता. फारूकने मुलीला घेऊन सिल्लोड येथे राहावे असा तगादा त्याच्या सासरच्या मंडळींनी लावला होता. मात्र, फारूकने या गोष्टीला नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी रविवारी सकाळी फारूकवर कुर्‍हाडीने हल्ला चढवला. आरडाओरड ऐकून फारूकचे वडील सय्यद अली (60) व चुलत भाऊ शकील धावून आले. या मारहाणीत फारूक जागीच ठार झाला, तर वडील सय्यद अली हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती