आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलास ठार मारणाऱ्या, आई-वडिलांना जन्मठेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माहेरी गेलेल्या सुनेला नांदवण्यावरून झालेल्या वादातून आई, वडील भावाने मिळून फाशी देऊन दुसऱ्या मुलास ठार मारल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा येथील सर्जेराव किसन काळे यांची पत्नी फुलाबाई मुलगा लक्ष्मण हे मृत मुलगा ज्ञानेश्वरसह ३० जून २०११ रोजी रात्री ९.१५ वाजता टीव्ही बघत होते. ज्ञानेश्वरची पत्नी माहेरी गेली होती. त्याने पत्नीस नांदायला आणू नये, असे आई-वडील भाऊ त्यास सांगत होते, परंतु तो ऐकायला तयार नव्हता. यातून कुटुंबात वाद झाला त्याचे पर्यवसान भांडणात झाले. तिघांनी मिळून ज्ञानेश्वरला फाशी देऊन ठार मारले. थोड्या वेळात तिघे (सर्जेराव, फुलाबाई लक्ष्मण) रात्री घरास कुलूप लावून जाताना सर्जेराव काळे यांचे सख्खे भाऊ भीमराव काळे यांना दिसले. त्यांनी करमाड पोलिसांना यासंबंधीची माहिती कळवली. पोलिसांनी दरवाजा उघडून पंचनामा केला. ज्ञानेश्वर घरातील बिछान्यावर उलटा पडलेला होता. त्याच्या गळ्याला व्रण होता. प्रकरणात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. बुधवंत यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी आठ साक्षीदार तपासले. न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली प्रत्येकी पाच हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले.