आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Aurangabad, Divya Marathi

पळसावाडीत चोरट्यांचा धुमाकूळ, सव्वा लाख लूटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - पळसवाडी शिवारात चोरांच्या टोळीने तीन तास धुमाकूळ घालत सव्वा लाखांचा ऐवज लुटला. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही.

मंगळवारी रात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी पळसवाडी परिसरातील घरे फोडण्यास सुरुवात केली. काही िठकाणी ग्रामस्थ जागे झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला. अखेर चोरट्यांनी शेख युसूफ यांच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या सुनेच्या अंगावरील दागिने लुटले. तसेच लहान मुलांच्या अंगातील सोन्याच्या बाळ्या काढून घेतल्या. यानंतर चोरट्यांनी रंगनाथ ठेंगडे यांच्या घराचा दरवाजा तोडून दागिने चोरून पळ काढला. चोरट्यांनी दोन्ही घटनेत एक लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. ग्रामस्थांनी पोिलसांना याची मािहती िदली. पोिलसांनी चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.