आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Bank Theft Issue At Aurangabad

कॅनडातील भामट्यांचा डल्ला, डाटा हॅक करून शिपायाचे पावणेदोन लाख लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुलीच्या उच्चशिक्षणासाठी दोन लाखांचे कर्ज घेऊन ती रक्कम बँक खात्यात ठेवली असता कॅनडातील भामट्यांनी आंतरराष्‍ट्रीय डेबिट कार्डचा डाटा व पासवर्ड हॅक करून 1 लाख 68 हजारांची खरेदी केली. भारतीय स्टेट बँकेत शिपाई असणा-या अनिल राम चांदेलकर यांना आठवडाभरापूर्वी मध्यरात्री रक्कम वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सिडको पोलिसांत बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
अनिल हे एसबीआयच्या सिडको एन-5 शाखेत शिपाई आहेत. त्यांची मुलगी बारावी उत्तीर्ण झाली असून तिला अभियंता बनवण्यासाठी त्यांनी बँकेकडून दोन लाखांचे कर्ज घेतले. पैसे खर्च होऊ नयेत म्हणून त्यांनी ती रक्कम खात्यातच ठेवली. मुलगी भविष्यात विदेशामध्ये शिकण्यासाठी गेली तर तिला आंतरराष्‍ट्रीय डेबिट कार्ड लागेल या हेतूने त्यांनी कार्डही मिळवले. परंतु कॅनडातील भामट्यांनी या कार्डचा पासवर्ड व इतर डाटा हॅक करून सुरुवातीला 1 लाख 12 हजार आणि नंतर 56 हजार अशी एकूण 1 लाख 68 हजारांची खरेदी केली. 14 जुलै रोजी मध्यरात्री त्यांच्या मोबाइलवर मेसेज धडकला. भारतात असताना आपल्या खात्यातून पैसे कसे वळते झाले याचा विचार करत त्यांनी सकाळी बँक गाठली तेव्हा खात्यात 17 हजार रुपयेच शिल्लक असल्याचे कळाले. त्यांनी तातडीने ती रक्कम काढून घेतली. आठ दिवस तपास करूनही काहीच हाती न लागल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली.