आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Congress Activist Suicide In Aurangabad, Divya Marathi

काँग्रेस कार्यकर्त्याची गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उस्मानपुरा फुलेनगर येथील कॉँग्रेसचे कार्यकर्ते भारत शामराव ससाणे (35) यांनी रविवारी दुपारी 2.45 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबीयांनी आपणाला घराबाहेर हाकलून दिले, अशी तक्रार त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर घरी जाऊन पत्नी आणि चार मुलींना घराबाहेर काढून सीलिंग फॅनला साडी बांधून गळफास घेतला. ते दार उघडत नसल्यामुळे घरच्यांना संशय आला. त्या वेळी आरडाओरड करून शेजार्‍यांना बोलावले.
दरवाजा तोडल्यानंतर भारत यांनी गळफास घेतल्याचे दिसले.
शेजारी राहणारे गणेश विश्वनाथ मगरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ससाणे यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.