आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Disinherit Bag Shown, Divya Marathi News

ज्युबिली पार्क भागात बेवारस सुटकेस, स्कूटरने उडाली धावपळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्युबिली पार्क परिसरातील ओमसाई हॉटेलशेजारी मंगळवारी सायंकाळी एक बेवारस स्कूटर आणि पायर्‍यांखाली काळ्या रंगाची सुटकेस सापडल्याने एकच धावपळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने अर्धा तास तपासणी केली. या वेळी सुटकेसमध्ये कपडे, मासिके आणि कागदपत्रे आढळून आली. तसेच स्कूटर सिटी चौक पोलिसांनी जप्त केली आहे.
एकीकडे शिवजयंतीचा बंदोबस्त सुरू असताना सायंकाळी सातच्या सुमारास ज्युबिली पार्क येथे बेवारस स्कूटर आणि पायरीखाली काळ्या रंगाची सुटकेस असल्याची माहिती एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यामुळे बॉम्बशोधक व नाशक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील जुमडे व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या परिसरातील चार ते पाच दुकाने बंद करण्याचे आवाहन करून पोलिसांनी जमाव पांगवला. श्वानाच्या मदतीने सुटकेस आणि स्कूटरची तपासणी करण्यात आली. त्यानंतर दोरीने बांधलेली सुटकेस तीन वेळा जमिनीवर आपटली. सुटकेसमध्ये कागदपत्रे आणि कपडे असल्याचे आढळल्यानंतर उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. ही बेवारस सुटकेस आणि स्कूटर सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा फोटो...