खुलताबाद - मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ख्याती असलेल्या खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे रविवारी एका पर्यटकावर सात ते आठ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला.
औरंगाबाद येथील धावणी मोहल्ल्यातील लुमेश लक्ष्मीनारायण बाखरिया, आदिनाथ वाघा, चेतन पूल, प्रज्वल जावळे, अिभजित िशंदे, मयूर सानप, वैभव राजपूत, रंजन साबणे हे रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी म्हैसमाळ येथे आले होते. येथील व्ह्यू पॉइंट व टीव्ही टॉवर पाहण्यासाठी सकाळी हे तरुण म्हैसमाळमध्ये आले होते. वनविभागाच्या प्रवेशद्वारावर पार्किंग वसूल करणाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. या वेळी पार्किंग वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना बेदम मारहाण केली. यात लुमेश बाखरिया याच्या डोक्याला दुखापत झाली. अन्य आठ जणांना मुका मार लागला आहे. बाखरिया याच्या तक्रारीवरून पार्किंग वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हैसमाळमध्ये मारहाण झाल्याची मािहती कळताच जखमी तरुणांचे नातेवाईक खुलताबाद पोिलस ठाण्यात दाखल झाले होते. यामुळे पोिलस ठाण्यात तणावाचे वातावरण होते. पोिलसांनी कारवाईचे आश्वासन िदल्यानंतर प्रकरण थंडावले आहे.
वन विभागाच्या प्रवेशद्वारावर अनेक िदवसांपासून प्रवेश शुल्क व पािर्कंग शुल्क आकारले जाते. त्यासाठी वन िवभागाने एक वन समिती िनयुक्त केली आहे. जमा होणाऱ्या रकमेतून साठ टक्के समितीला तर चाळीस टक्के वन विभागाला िदले जातात. पार्किंगचे पैसे वसूल करण्यावरून वारंवार पर्यटक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतात. त्यातून पर्यटकांना मारहाणीच्या घटना घडत आहेत.
म्हैसमाळमध्ये अनेक वर्षे पार्किंग वसूल केली जात नव्हती. परंतु सध्या वनविभागाने पैसे वसुली मोहीम सुरू केल्यामुळे वाद उदभवत आहेत. येथील पार्किंग कायमची बंद करण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.