आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Golden Chain , Aurangabad, Divya Marathi

दर्शनासाठी जाणार्‍या महिलेचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गणपती मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतणार्‍या महिलेचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावले. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता सिडको एन-8 परिसरातील गणेश हाउसिंग सोसायटीसमोर घडली.


जालन्यातील सुभद्रानगर भागात राहणार्‍या माधुरी दीपक मांडे (40) ह्या औरंगाबादेतील सिडको एन-8 मध्ये माहेरी आल्या होत्या. सकाळी त्यांनी गणेश हाउसिंग सोसायटीतील गणेश मंदिरात दर्शन घेतले व घराकडे परत निघल्या. तितक्यात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत बजाज डिस्कव्हर दुचाकीवरील दोघे पसार झाले होते. पाठीमागे बसलेल्याने मंगळसूत्र हिसकावल्याचे माधुरी यांनी पोलिसांना सांगितले आहे. दुचाकी चालवणारा सावळा आणि सडपातळ होता, तर पाठीमागे बसलेला काळ्या रंगाचा आणि बुटका असल्याचे वर्णन त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण करत आहेत.


येरवड्यातून दोघा चोरट्यांना आणले : मंगळसूत्र चोरीतील दोघांना सिडको पोलिसांनी पुणे येथील येरवडा कारागृहातून आणले आहे. या दोघांनी औरंगाबादेत चोर्‍या केल्याचा संशय पोलिसांना आहे. सुधाकर जोसेफ गायकवाड (43) आणि मुस्लिम यासीन इराणी (20, दोघेही रा. इराणी गल्ली, र्शीरामपुरा) असे ताब्यात घेतलेल्या नावे आहेत. या दोघांनी पुण्यात अनेक मंगळसूत्रे हिसकावण्याचे गुन्हे केले होते. जानेवारी 2014 पासून आजपर्यंत आयुक्तालयाच्या हद्दीतून मंगळसूत्र चोरीचे 17 पेक्षा अधिक गुन्हे घडले होते.