आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Murder, Divya Marathi, Aurangabad

गुन्हे वार्ता: महिनाभरात झाले दहा जणांचे खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिवसेंदिवस नैतिक मूल्ये घसरत चालल्याने पैसा, संशय आणि पूर्ववैमनस्यातून महिनाभरात खुनाच्या सहा घटना घडल्या. यामध्ये 10 जणांचा बळी गेला आहे. यापैकी दोन घटनांमध्ये तर अख्खे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. शहरात एकट्या राहणार्‍या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. पोलिस अनेक उपाययोजना राबवूनही अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. ‘दिव्य मराठी’ने घेतलेल्या खुनांच्या मालिकेचा हा आढावा.


24 फेब्रुवारी : मित्राचा खून करून ड्रेनेजलाइनमध्ये कोंबले
वाळूज एमआयडीसीमधील उत्तर प्रदेशातील अनंतलाल चंद्रबली चौहान याने त्याचा मित्र संतोष चौहानला दोन हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे मागण्यासाठी तो संतोषच्या घरी गेला असता दोघांमध्ये वाद झाला आणि संतोषने अनंतलालचे डोके ओट्याच्या फरशीवर आदळून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह ड्रेनेज लाइनमध्ये टाकला होता. सहा मार्चला घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शोध घेत संतोषला अटक केली होती.
2 मार्च : हॉटेल व्यावसायिकाने कुटुंब संपवले
लेडीज सर्व्हिस बार टाकण्यासाठी मनोज जैस्वालने मोंढा नाका येथील राहुल हॉटेल चालवण्यासाठी घेतले होते. त्यासाठी हॉटेलमालक अँड. र्शीचंद जग्यासी यांना 11 लाख रुपये दिले होते. जग्यासी मात्र हॉटेल चालवण्यासाठी देत नसल्याने जैस्वालने पत्नी नीता, मुलगा पुष्करला विष पाजून आणि गळा आवळून त्यांचा खून केला. तसेच स्वत:देखील विष प्राशन करून गळफास घेतला. ही घटना सहा मार्चला उघडकीस आली होती. सुसाइट नोटवरून पोलिसांनी जग्यासींना अटक केली.
13 मार्च : मित्राला पाठवले यमसदनी
जिन्सी परिसरातील मकसूद कॉलनीतील शेख मुदस्सीर शेख ख्वाजामियाँ गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करायचे. व्यावसायिक वादातून त्यांच्यासोबत काम करणारे सय्यद सादिक सय्यद आरेफ, सय्यद अकबर सय्यद अमीर आणि महंमद साजिद महंमद खालेद यांनी दोरीने गळा आवळत खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह गौताळा अभयारण्यात फेकून दिला. या तिघांनी स्वत:चे मोबाइल घरीच ठेवले होते. आरोपींना पोलिसांनी अटक केली.
16मार्च: अन् चक्क पोलिस शिपायाने केला खून
16 मार्च - जयभवानीनगरातील शीतल बेडवाल या विवाहितेचा गळा आवळून खून करण्यात आला. तिच्या बँक खात्यातील चार लाख रुपयांवर डोळा ठेवून हे कृत्य करण्यात आले. उषा शिंदे या महिलेने पोलिस शिपाई संदीप पवारला हाताशी धरून खुनाचा बेत आखला होता. या प्रकरणात रवींद्र दांडगे, उषा शिंदे आणि संदीप पवार यांना 22 मार्च रोजी अटक करण्यात आली.
24 मार्च : भीमशक्तीच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
24 मार्च - भाचीची छेड काढणार्‍या सचिन पगारेला मिलिंदनगरातील भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव यांनी 15 दिवसांपूर्वी झापड मारली होती. तो राग मनात धरून पगारेसह त्याचे साथीदार अनिल बादाडे आणि संदीप जाधव यांनी राजू जाधव यांचा भरदिवसा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
25 मार्च - मानगुटीवर संशयाचे भूत बसल्याने पहाटे तीनच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला असलेल्या जितेंद्र धांडेने पत्नी अश्विनीसह चिमुकल्या छाया आणि हर्षदाचा गळा आवळला. अख्खे कुटुंब संपवून त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.