आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Rape Issue At Aurangabad, Divya Marathi

ज्यूसचे आमिष दाखवत बालिकेवर अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- साईबाबा मंदिरात मैत्रिणीसोबत आरतीसाठी गेलेल्या आठवर्षीय बालिकेला शेजारी राहणार्‍या प्लंबरने ज्यूस पाजण्याचे आमिष दाखवत मंदिरासमोरील मैदानात नेत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी रात्री आठ ते पावणेनऊच्या सुमारास पदमपुरा भागात घडली. पोलिसांनी नराधमास अटक केली असून, धीरेंद्र राजेंद्र मल्लिक (35, रा. सोनार गल्ली, पदमपुरा) असे त्याचे नाव आहे.

पदमपुर्‍यातील सोनार गल्लीत आठवर्षीय बालिका तिच्या आजी आणि आईसोबत राहते. ती तिसर्‍या वर्गात आहे. ती नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री मैत्रिणीसोबत साईबाबा मंदिरात आरतीसाठी गेली होती. दरम्यान, धीरेंद्रने तिला ज्यूस पाजतो असे आमिष दाखवले. मंदिराजवळील मंगल कार्यालयासमोरील मैदानात नेऊन त्याने बालिकेवर अत्याचार केला. यानंतर तो पसार झाला. बालिकेने घडला प्रकार तिच्या आजीला सांगितला.

बालिकेसह तिची आजी आणि आई यांनी रात्री 11 वाजता क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी महिला दक्षता समितीच्या सदस्या किरण शर्मा यांच्यासमक्ष बालिकेचा जबाब नोंदवला. सहायक पोलिस निरीक्षक अशोक गिरी, जमादार हेमंत सुपेकर, नितीन जाधव, प्रकाश डोंगरे, मुनीर पठाण, समद पठाण यांनी धीरेंद्रला अटक केली. रात्री बालिका व धीरेंद्रची घाटीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. धीरेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले, असता न्यायालयाने त्याची 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.