आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Rape On Girl At Aurangabad, Divya Marathi

युवतीवर बलात्कार; आरोपीला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- नगर जिल्ह्यातील मेहकरी येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून आणून बलात्कार करणार्‍या मेहकरी येथील तरुणाला वाळूज येथे अटक करण्यात आली. पीडित मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किशोर शंकर पालवे (19, रा. मेहकरी, ता. नगर) असे आरोपीचे नाव असून त्याला नगर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मेहकरी येथील किशोर पालवे या तरुणाने पाच मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून आणून वाळूज येथे ठेवले होते. त्यासाठी त्याने लायननगर भागात भाड्याने खोली घेतली होती. दरम्यानच्या काळात पीडित मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार 6 मार्च रोजी नगर ग्रामीण पोलिसांत दिली होती. या तक्रारीत किशोर पालवे या तरुणावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांच्या तपासात आरोपी किशोरनेच पीडित मुलीला पळवून नेऊन वाळूजला ठेवल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून नगर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. एस. नरवडे, हवालदार एम. एम. शेख व ए. एम. घोरपडे यांच्या पथकाने 25 मार्च रोजी वाळूज पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या सहकार्याने लायननगर भागातील खोलीवर टाकलेल्या छाप्यात आरोपी किशोर व पीडित अल्पवयीन मुलगी आढळून आली. त्या दोघांनाही ताब्यात घेऊन नगर पोलिस रवाना झाले होते. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे किशोरविरुद्ध पोलिसांनी अनैतिक संबंधासाठी पळवून नेऊन बलात्कार केल्याच्या गुन्ह्याची नोंद क रून त्याला अटक केली आहे.