आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Stenographer Shadeo Waghmare Suicide Issue At Aurangabad

मुंबईतील स्टेनोग्राफरची शहरात आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुंबईच्या माटुंगा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) कार्यालयात स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत असलेल्या शहादेव बाबूराव वाघमारे (40, रा. एमएसईबी कॉलनी) यांनी शहरातील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. 26 मार्च रोजी ते शहरात आले होते.मध्यवर्ती बसस्थानकासमोर भोईवाडा येथील जनता लॉजमध्ये एक खोली त्यांनी घेतली होती. हर्सूल येथील एका नातेवाइकाच्या घरी मुक्काम करून ते जनता लॉजमध्ये 27 मार्च रोजी आले होते.

दोन दिवसांपासून त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला नसल्यामुळे लॉजच्या कर्मचार्‍यांना शंका आली. त्यांनी खोलीच्या मागील खिडकीतून डोकावून पाहिले असता शहादेवने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर घटनास्थळावर क्रांती चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक गिरी, जमादार रमाकांत पटारे दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून शहादेवचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेला. नायलॉनच्या दोरीने वाघमारे यांनी गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.