औरंगाबाद - मुलाचे भांडण झाल्यामुळे पोलिस कारवाई करतील या भीतीपोटी 40 वर्षीय माता तीन अल्पवयीन मुलांना घेऊन फरार झाली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून चौघे बेपत्ता असल्याची नोंद सातारा पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. पैठण रोडवरील हिंदुस्थान आवास येथील रहिवासी राणी सुमंगल विश्वास या महिलेच्या मुलांच्या शेजारी राहणार्या मुलाशी झालेल्या भांडणानंतर 26 एप्रिल रोजी 12 वर्षीय अनुप, 14 वर्षीय आशिष आणि 16 वर्षीय अमित यांना घेऊन त्या निघून गेल्या आहेत. त्या मूळ गावी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ही मुले आणि त्यांची माता आढळल्यास सातारा पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. जे. दाभाडे यांनी केले आहे.