आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Theft Issue At Aurangabad, Divya Marathi

कारची काच फोडून पावणेदोन लाख लांबवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उभ्या कारची काच फोडून भरदिवसा एक लाख 63 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी दुपारी पंढरपूर येथे घडली. औरंगाबाद शहरातील सचिन विश्वनाथ पवार (20, रा. सिडको वसाहत, औरंगाबाद) हे कार (एमएच 20 682) मधून वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत एक लाख 63 हजार रुपयांची रोकड घेऊन जात होते. काही कामानिमित्त ते पंढरपूर येथे महामार्गावरील अब्बास पेट्रोल पंपसमोर थांबले. तेथे कार थांबवून ते लगतच्या वाहन बाजारात गेले. तेथून परत येईपर्यंत काही मिनिटांतच चोरट्यांनी त्यांच्या कारची उजव्या बाजूची काच फोडून सीटवर ठेवलेल्या बॅगेतील 1 लाख 63 हजार रुपयांची रोकड घेऊन धूम ठोकली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस उपनिरीक्षक एन. पी. शिंदे तपास करत आहेत.