आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Theft Issue At Aurangabad, Divya Marathi

मेहुणीने लुटले भावजीचे घर, दोन लाखांचे दागिने लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद खंडपीठाचे सेवानिवृत्त सहायक प्रबंधक पुंडलिक श्रावण उंदीरवाडे यांच्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या त्यांच्या चुलत मेहुणीने दोन लाख रुपयांचे दागिने लांबवले. हा प्रकार सिडको एन-6 मधील जनाबाई गृहनिर्माण संस्थेत पाच मे रोजी घडला. उंदीरवाडे यांनी मेहुणी मेघा ढवळे हिच्याविरुद्ध कढोली (जि. गडचिरोली) पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, सिडको ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उंदीरवाडे कुटुंब तेरवीच्या कार्यक्रमासाठी 5 मे रोजी गावाकडे जाण्याच्या तयारीत असताना दीड तासासाठी पाहुणी म्हणून आलेल्या मेघाने सुटकेसमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले 1 लाख 84 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दांगिने लांबवले. उंदीरवाडे गडचिरोली जिल्ह्यातील कढोळी (ता.कुरखेडा) येथे गेले. त्यांच्यासोबत मेघाही होती. दरम्यान, गावी गेल्यानंतर सुटकेसमधील दागिन्यांचा डबा गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शोधाशोध केली. शेवटी मेघाकडे संशयाची सुई गेली. त्यांनी कढोली (जि. गडचिरोली) पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी झीरोने गुन्हा दाखल करून सिडको पोलिस ठाण्यात प्रकरण वर्ग केले. सिडको ठाण्यात नंतर चोरीचा गुन्हा दाखल झाला. मेघा ढवळे (19) ही शिक्षणानिमित्ताने औरंगाबादेत एका वसतिगृहात राहते. तिचे उंदीरवाडे यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. 5 मे रोजी मेघाशिवाय दुसरे घरात कुणीही आले नव्हते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजाराम तडवी करत असून, मेघाला पोलिसांनी अद्याप चौकशीसाठी बोलावले नाही.