आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Young Arrested For Rep Case, Divya Marathi News

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, तरुणास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत महिनाभर शारीरिक संबंध ठेवणार्‍या तरुणास पैठण पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने मध्य प्रदेशात जाऊन अटक केली. रविवारी दुपारी आरोपीस पैठणला आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पैठण परिसरात असलेल्या वीटभट्टीवर मजुरीचे काम करण्यासाठी परराज्यातून आलेल्या 17 वर्षीय मुलीवर शेजारीच राहणार्‍या रवी बलीकराम मरवक्ते (21) याने लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत तिला महिनाभरापूर्वी पैठणहून पळवून नेले. यासंदर्भात पीडित युवतीच्या वडिलाने पैठण पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पैठण पोलिस ठाण्यातील फौजदार ए. जी. पाटोळे, संतोष चव्हाण, विष्णू गायकवाड, सिराज पठाण, कोमल देहाडराय यांच्या पथकाने शनिवारी मध्य प्रदेशात जाऊन त्या जोडप्यास ताब्यात घेतले. त्यानंतर पैठणला आणले असता पीडित युवतीने पैठण पोलिसांत रवीने 1 डिसेंबर ते 14 फेब्रुवारीदरम्यान अत्याचार केल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा रवीविरुद्ध कलम 376 व बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये नोंदवण्यात आला आहे.