आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Youth Suicide Issue At Harshul, Divya Marahti

हर्सूल तलावात उडी घेऊन मजुराची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंढरपूर परिसरातील मजुराने एक मे रोजी दुपारी हसरूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. इरफान पठाण अब्दुल्ला रहेमान पठाण (22) असे त्याचे नाव असून त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील इरफान पठाण याचे गेल्या महिन्यात 20 एप्रिल 2014 रोजी फुलंब्री तालुक्यातील जानेफळ येथे लग्न झाले. तो पंढरपूर परिसरात मजुरीकाम करायचा. एक मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास तो घरातून निघून गेला होता. कुटुंबीयांनी सायंकाळी तो बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात केली. सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास हसरूल तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पुढील तपास जमादार ए. बी. शेख आणि संजय चव्हाण करत आहेत.