आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi,suicide Issue At Aurangabad, Divya Marathi

विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या अतोनात छळाला कंटाळून विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना बजाजनगर येथील अयोध्यानगरात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. अरुणा क्रांतेश्वर बनकर (19) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून अरुणाचा पती क्रांतेश्वर, दीर अजय व सासू अंजली यांना अटक केली आहे.
आरोपी क्रांतेश्वर कैलास बनकर (25) याचा विवाह 2 जून 2013 रोजी कन्नड तालुक्यातील वडाळी येथील पोलिस पाटील काकासाहेब पवार यांची मुलगी अरुणा हिच्याशी झाला होता. विवाहानंतर पती-पत्नी अयोध्यानगरात भाड्याच्या खोलीत राहत होते. क्रांतेश्वर हा कराटे क्लास घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मागील काही दिवसांपासून सासरे कैलास भिकाजी बनकर, पती क्रांतेश्वर, दीर अजय, सासू अंजली व नणंद रोहिणी यांनी कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी अरुणाचा छळ सुरू केला. सततच्या छळाला कंटाळून अरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी क्रांतेश्वर हा बाहेर गेला होता. ही संधी साधून अरुणाने घराचा दरवाजा बंद करून कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेतले. दुपारची उष्णतेची धग व रॉकेलने क्षणातच पेट घेतल्याने ती आरडाओरड करू लागली. पेटलेल्या अवस्थेतच ती बाथरूमच्या कोपर्‍यात जाऊन भिंतीला टेकून खाली बसली आणि त्याच अवस्थेत तिचा अंत झाला. घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी दरवाजा तोडून तिला तत्काळ घाटीत हलवले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला तपासून मृत घोषित केले. अरुणाचे वडील काकासाहेब पवार यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्येपूर्वी केला वडिलांना फोन
आत्महत्या करण्यापूर्वी अरुणाने वडील काकासाहेब पवार यांना मोबाइलवरून संपर्क साधत मला भेटायला का आले नाहीत? सासरचे लोक फ ार त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच तिने पेटवून घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तिच्या वडिलांना दूरध्वनी करून अरुणाने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला.