आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन चोरांचा मास्टरमाइंड जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - घरफोडीसह चोरीच्या गुन्ह्यांत दोन अल्वपवयीन सराईतांकडून ५० हजारांच्या सोन्याच्या दागिन्याची लगड हस्तगत करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांची बालसुधारालयात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे दोन प्रकार घडले होते. यामध्ये दोन अल्पवयीन चोरांचा समावेश होता. सहायक आयुक्त सचिन गोरे आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक सदानंद इनामदार यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरात फिरणारे दोन लहान मुले सोन्याची लगड विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सराफ व्यावसायिक असल्याचे सांगत एका सराफाच्या दुकानात पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दोघांना सोन्याची लगड विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिस उपआयुक्त अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गोरे, निरीक्षक इनामदार, दीपक गिरमे, चंद्रकांत पळशीकर, सुरेश माळोदे, शरद सोनवणे अादींच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.