आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला रॉकेल टाकून पेटवले, पती अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- अंगावर रॉकेल टाकून पेटवून देणाऱ्या पतीविरोधात पत्नीच्या तक्रारीवरून जिवे मारण्याचा वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ९८ टक्के भाजलेल्या संगीता रवी पाटोळे (३०) या महिलेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जोगेश्वरी येथे राहणाऱ्या रवी सर्जेराव पाटोळे (३५) हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमीच मारहाण करत होता. मंगळवारी, २३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, रवीने संगीताच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. ती गंभीररीत्या भाजली. तिला घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...