आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसार व्यापाऱ्यावर दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना- शिवना येथील भुसार व्यापाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यासाठी तब्बल दीड वर्ष ठाण्याचे उंबरठे झिजवणाऱ्या एका शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अखेर अजिंठा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी फरार असल्याने त्याला ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

येथील शेतकरी दादाराव दत्तू काळे यांनी भुसार व्यापारी शेख मुश्ताक शेख इसा (३८) यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी ५० क्विंटल मका व ३२ क्विंटल सोयाबीन विक्री केली होती. त्याचे एकूण एक लाख ६७ हजार ८५० रुपये रक्कम त्यांच्याकडून घेणे झाले. मात्र, त्यानंतर ती रक्कम देण्यास त्याने टाळाटाळ सुरू केली. वर्षभराच्या तगाद्यानंतर त्याने त्या शेतकऱ्यास ६० हजार रोख देऊन गावातून पोबारा केला. त्या व्यापाऱ्याचा फोनही बंद येत असल्याने त्याचा मागोवा घेणे कठीण झाले आहे. काळे यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
न्यायासाठी दीड वर्ष प्रतीक्षा करतोय
मी एक सामान्य शेतकरी आहे. मला कायद्यानुसार न्याय मिळावा व त्या व्यापाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. या उद्देशाने मी दीड वर्षापासून पोलिस ठाण्यात खेटे मारले. मात्र, दखल घेतली गेली नाही. शेवटी मला न्याय्य हक्कासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचना करावी लागली. आज त्यांच्या आदेशावरूनच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दादाराव दत्तू काळे, फिर्यादी शेतकरी, शिवना.