आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनातील आरोपी घाटीतून पळाला; थंडी, खोकल्याचा त्रास असल्याने केले होते दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खुनाचा आरोप असलेला आरोपी घाटीतील एक्सरे विभागातून पळून गेल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. मुकेश ऊर्फ सुखदेव लाहोट (३६, रा. पडेगाव असे पसार आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर छावणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. मुकेश हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला थंडी आणि खोकल्याचा त्रास असल्याने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सोमवारी पोलिस नाईक इंगळे त्याला एक्सरे काढण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांची नजर चुकवून मुकेश चतुर्भुज झाला. मुकेशवर २०१६ मध्ये भीमनगर भावसिंगपुरा येथील युवक शेख उल्ताफ ऊर्फ पीटर याचा लाकडी दांड्याने मारून खून केल्याचा आरोप आहे. मुकेश पसार झाल्याची माहिती कळताच पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त रविकांत बुवा, पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
 
बातम्या आणखी आहेत...