आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरीरसुखासाठी विवाहितेला पेटवणारा अखेर गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - घरात एकट्या असणाऱ्या विवाहितेकडे मध्यरात्रीच्या सुमारास शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीला पती कामाहून येण्याची वेळ झाली आहे तू निघून जा, असे सांगणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना बजाजनगरात ११ जून रोजी घडली. या भामट्याला पोलिसांनी पुणे येथे अटक केली.
गंभीररीत्या भाजलेल्या महिलेचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १५ जून रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी समाधान साहेबराव काळे (२४, रा. माळीवाडा, कन्नड, जि. औरंगाबाद, हल्ली मुक्काम पवननगर, रांजणगाव) विरोधात ठार मारण्याचा प्रयत्न खून असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर तब्बल चार महिने फरार असणाऱ्या आरोपीला अखेर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वाळूज येथील एका मोठ्या कंपनीत आरोपी मृत महिला सोबत काम करत असल्यामुळे त्यांची ओळख होती. दरम्यान, आरोपी समाधानने महिलेसोबत ओळख वाढवल्यामुळे त्याचे महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. घटनेच्या दिवशी महिलेचा पती घरी नसताना ११ जून २०१६ रोजी १२.३० वाजता मध्यरात्री आरोपी समाधान बजाजनगर येथील महिलेच्या घरी गेला. दरम्यान, समाधानने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावर पती कंपनीतून घरी परतण्याची वेळ झाल्याचे सांगून महिलेने त्यास शरीरसुखासाठी नकार दिला. महिलेच्या नकारामुळे संतप्त झालेल्या समाधानने घरातील रॉकेलच्या कॅनमधील रॉकेल महिलेच्या अंगावर ओतून महिलेला पेटवून देत घरातून पळ काढला.

वेटर म्हणून काम करत होता
आगीमध्ये गंभीररीत्या भाजलेल्या महिलेचा मृत्यू होणार असल्याची खात्री बाळगून समाधानने तत्काळ औरंगाबाद सोडले. मोठ्या शहरात गेल्यानंतर वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे आपण पकडले जाऊ याची भीती असणाऱ्या चलाख आरोपी समाधानने महामार्गावरील खेडेगावात राहणे मिळेल ते काम करण्याचे ठरवले. तो पुणे जिल्ह्यातील औसारी फाटा, मंचर तालुका आंबेगाव येथे एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करत होता. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी समाधानची माहिती मिळाली, माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक ए. डी. जहारवाल यांच्या आदेशावरून पोलिस हेडकाॅन्स्टेबल विजय कांबळे, सुखदेव कोल्हे आदी संबंधित हॉटेलवर वेशांतर करून गेले. आरोपी समाधानची खात्री होताच त्याला सापळा रचून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...