आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड येथील नगराध्यक्षांना शिवीगाळ, फावडेही उगारले; शंभर जणांवर गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - नगराध्यक्ष स्वाती संतोष कोल्हे यांना शिवीगाळ करून फावडे अंगावर उगारल्याप्रकरणी कन्नड पोलिसांत आघाडीच्या दोन नगरसेवकांसह शंभर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी काही काळ शहरातील वातावरण तणावग्रस्त बनले होते.
 
याबाबत कन्नड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार, २२ रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास कन्नड पालिका कार्यालयात स्थायी समितीची बैठक सुरू असताना आघाडीचे नगरसेवक अय्यास शहा यांनी शहरात साफसफाई होत नाही या मागणीवरून नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांना शिवीगाळ करत फावडे उगारले त्यांच्या केबिनच्या काचा फोडून नगरसेवक संतोष तोताराम पवार, सईद मिस्त्री इतर शंभर लोकांचा जनसमुदाय नगराध्यक्षाच्या चेंबरमध्ये आणून गोंधळ घातला. नगर परिषदेच्या पायऱ्यांसमोर एक ट्रॅक्टर घाण आणून टाकली आणि स्थायी समितीची सभा उधळून लावली. त्या वेळेला मुख्याधिकारी संतोष आगळे, शेख मजिद शेख बशीर, स्वच्छता निरीक्षक देविदास पाटील असे कर्मचारी हजर होते. याप्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक अय्यास शहा, संतोष पवार सईद मिस्तरी आदींसह इतर शंभर लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नगराध्यक्षांची तक्रार घेण्यास पोलिस विलंब लावत होते तेव्हा नगराध्यक्ष संतप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे पोलिस अधीक्षक ग्रामीण डॉ. आरती सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए.जी. शिंदे हे करीत आहेत. उलटपक्षी सईद मिस्तरी यांनी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, योगेश कोल्हे, राजू मोकसे, रवी राठोड, बंटी काशीनंद, किसनकाका कोल्हे यांच्याविरोधात शिवीगाळ प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार अशोक तुपे हे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...