आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केला पिंपळेच्या कारमधूनच प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हर्सूल कारागृहाच्या परिसरातून मोक्कातील आरोपी ज्ञानेश्वर पिंपळे पसार झाल्याचा बनाव मुख्यालयातील पोलिसांनी केला असल्याचे उघड झाले असून या तिघांनीही पिंपळेच्याच कारमधून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पिंपळेसोबत त्यांनी हॉटेलात मद्यप्राशन व जेवण केले होते की नाही, याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत अद्याप कुठलीही माहिती नसल्याचे उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सोमवारपर्यंत पूर्ण होईल. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

कारागृहातून निघाल्यानंतर सहायक फौजदार गोपीनाथ गंगावणे, जमादार सुनील प्रधान व शिपाई विश्वास निकम हे मध्यवर्ती बसस्थानकावर आले. तेथून त्यांनी राहात्यापर्यंतच्या प्रवासाचे वॉरंट फाडले (बस वाहकाकडून तिकीट घेतले) होते. बसने प्रवास करत ते नेवाशापर्यंत गेले. नेवाशाला उतरून हे चौघेही पिंपळेच्या कारमध्ये बसून राहाता न्यायालयात गेले. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास त्यांनी राहाता बसस्थानक गाठले. तेथून श्रीरामपूरपर्यंतचे वॉरंट फाडले. मात्र, तेथून चौघेही कारने श्रीरामपूरपर्यंत आले. तेथेदेखील त्यांनी चौघांचे श्रीरामपूर ते औरंगाबादपर्यंतचे वॉरंट फाडले. पण पिंपळे हा श्रीरामपूरहूनच पसार झाला, असा अंदाज आहे, तर श्रीरामपूरहून पोलिस आयुक्तालयापर्यंत हे तिघे पिंपळेच्याच कारमध्ये आले.