आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची आत्महत्या, पाचो-यातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हातकडीसह पलायन केले. पोलिस त्याचा पाठलाग करत असताना तो व्यापारी संकुलावर चढून वर गेला. त्यानंतर त्याने थेट तिस-या मजल्यावरून उडी घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडलेल्या या घटनेने पोलिसांना घाम फुटला. जुबेर शहा (२२, रा.मच्छी बाजार, पाचोरा) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर जुबेरच्या नातेवाइकांनी मृतदेह सोबत आणत पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करत ठाण्याची नासधूस केली.

या प्रकरणी अनिल जाधव व विकास देशमुख या दोन पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. दिवाळीत शहरातील मनोज राठी यांच्या घरातून सव्वादोन लाखाचा ऐवज चोरीस गेल्याप्रकरणी जुबेरला मुख्य आरोपी मुक्तार ऊर्फ धड्या याने दिलेल्या चोरीच्या कबुलीनुसार अटक करण्यात आली होती. काही जबाब देण्यासाठी आरोपी जुबेर शहा यास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांच्यापुढे हजर करण्यासाठी लॉकअपबाहेर काढण्यात आले. कॅबीनमध्ये शिरताच जुबेरने पोलिसांना झटका देऊन पलायन करत इमारतीच्या तिस-या मजल्यावरून उडी घेतली. यात त्याचा मृत्यू झाला. जुबेर हा घरातील एकुलता एक व कमावता मुलगा होता. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप जुबेरच्या कुटुंबीयांनी करत मदतीची मागणी केली आहे.