आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Criminal Suicide Attempt In Aurangabad Police Custody

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशयित आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न; घाटीत उपचार सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाळूज परिसरातील मोहटादेवी चौकातील बालाजी ज्वेलर्समध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यातील एका संशयित आरोपीने गुरुवारी (29 ऑगस्ट) रात्री पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर घाटी रुग्णालयत उपचार सुरू आहेत.

सोन्या-चांदीचे व्यापारी बालाजी पाटील यांचे दुकान चोरट्यांनी 26 ऑगस्टला फोडून त्यातील दोन लाखांचा ऐवज लंपास केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहून वाळूज पोलिसांनी दोन आरोपींना बुधवारी अटक केली. त्यांनी दिलेल्या कबुलीनंतर रवींद्र हरिदास नेव्हाल (वय, 28, शिवराई, वाळूज) याच्याकडे संशयाची सुई वळली. पोलिसांनी त्याचे वडील हरिदास यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तो पोलिस ठाण्यात आला. त्याने मद्यप्राशन केले असावे, असे वाटल्याने पोलिसांनी त्यांची खडसावून चौकशी सुरू करताच तो खाली कोसळला. त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, चोरी प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी सुधाकर गोरे (21, रा. बकवालनगर, वाळूज), विकी ऊर्फ दत्ता बाळासाहेब रणखांब (28, रा.लासूर, हल्ली मुक्काम बजाजनगर) यांना अटक केली. पोलिस ठाण्यात येण्यापूर्वीच त्याने विष प्राशन केले होते. तो सराईत गुन्हेगार आहे किंवा नाही, याची माहिती नाही असे सहायक पोलिस आयुक्त के.एस. बहुरे यांनी सांगितले.