आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal World : Fake Note Buyers Arrested In Waluj

गुन्हेगार विश्‍व: खोट्या नोटा विकणारे दोघे वाळूजमध्ये जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देण्याच्या आमिषाने फसवणूक करणा-या दोघा भामट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी रात्री जेरबंद केले. या भामट्यांकडून दीड हजार रुपयांसह साडेदहा हजारांच्या बनावट नोटा तसेच नोटांच्या आकाराचे कोरे कागद जप्त करण्यात आले आहेत.
बनावट नोटा विकण्यासाठी बजाजनगरात सायंकाळी 7 च्या सुमारास दोघे जण पल्सरवर (एमएच 21 एसी 4277) आले. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी योगेश सर्जेराव वाहेकर (24, मंठा) व अयनूल हक ऊर्फ औलक अब्दुल हक पटेल (23, गाढेजळगाव) यांना पकडले.
केवळ दीड हजाराच्या ख-या नोटा : भामट्यांकडील कापडी बॅगेत नोटांची बंडले आढळली. मात्र त्यात दीड हजाराच्या ख-या व 10 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा आणि
नोटांच्या आकाराचे कोरे कागद असलेली 20 बंडले होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
असा होता फंडा : तीन लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या बदल्यात खरे एक लाख घेऊन फसवणूक करण्याचा त्यांचा फंडा होता. यासाठी ग्राहकाचा शोध घ्यायचा. बनावट नोटांचे बंडल असल्याचे भासवण्यासाठी काही ख-या आणि काही बनावट नोटा लावून मोठे बंडल तयार करायचे. पटवलेल्या ग्राहकाच्या हातात या बंडलांची बॅग दिल्यानंतर सोबतच्या इतर साथीदारांनी ‘पोलिस आले पोलिस आले’ अशी बोंब ठोकल्यावर पसार व्हायचे, असा त्यांचा फंडा होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी दिली.