आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीरस्वरूपाचे २९ गुन्हे दाखल असणा-या गुन्‍हेगाराला मिळाला पासपोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असताना तब्बल २९ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला पोसपोर्ट देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. २०११ मध्ये हाजी याने खोटी कागदपत्रे सादर करून पासपोर्ट मिळवले. यातील दोषी पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

खुलताबाद गुलजार मोहल्ला येथील हाजी मोईनोद्दीन शेख याने खोटी कागदपत्रे सादर करून पासपोर्ट मिळवले. हा प्रकार माहितीच्या अधिकाराखाली उघड झाला. त्याला बुधवारी सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे. कुतुबोद्दीनवर विविध प्रकरणांत २९ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला १९९९ २००३ पोलिसांनी हद्दपारही केले होते. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोन गुन्ह्यांत त्याला शिक्षाही झालेली आहे. त्याने ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून पासपोर्ट काढण्यास अडचण येत असल्यामुळे शहरातील बुढीलेन येथे राहत असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली होती. पोलिसांनीदेखील ती केवळ नावापुरती तपासून त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यामुळे त्याला पासपोर्ट कार्यालयातून सहज पासपोर्ट मिळाला. हाजीवर ४२०, ४६७, ४६८, ४६८, ४७१, ४७२ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव उदार करत आहेत. याबाबत महाराष्ट्राच्या पासपोर्ट विभागाच्या प्रमुख स्वाती कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता प्रकरण समजावून घेऊन त्याची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.