आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... ही तर सरकारची झोटिंगशाही; आमदार नीलम गोऱ्हे यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कर्जमाफीच्या प्रकरणात ऑनलाइन प्रक्रियेला शिवसेनेने विरोध केला होता. आता प्रत्येक सरकारी कामात ऑनलाइनची सक्ती केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे ही ऑनलाइन झोटिंगशाहीच असल्याची टीका शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली. 

विधान परिषदेच्या विशेष अधिकार समितीची बैठक सोमवारी आमदार गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, कर्जमुक्तीसाठी शिवसेना आग्रही होती. सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही अंमलबजावणी योग्यरीत्या केली नाही. कर्जमाफीच्या वेळेसही ऑनलाइन करू नका. अडचणी येतील, असे आम्ही सांगितले होते. कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही असल्याने ‘आम्ही लाभार्थी’ अशी जाहिरात करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. 

वेगळा विदर्भ मुद्दा बॅकफूटवर 
शिवसेनेच्याआक्रमकतेमुळेच वेगळा विदर्भ करण्याचा मुद्दा बॅकफूटवर पडला आहे. औरंगाबाद, मुंबई, परभणी आदी महापालिकांना जीएसटीचा वाटा मिळावा. विकासासाठी निधी द्या, असे कटोरे घेऊन मागण्याची वेळ येऊ नये, ही भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्या म्हणाल्या. 
बातम्या आणखी आहेत...