आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीटीएचे संचालक धुमाळ पोलिसांच्या ताब्यात, व्याजाच्या आमिषाने १८ लाखांचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अधिक व्याजदराचे आमिष दाखवून १८ लाख ५० हजारांची फसवणुक करणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीटीए कंपनीचे संचालक प्रशांत रमेश धुमाळ (४८) यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन-२ सिडको येथील रहिवासी मोना पुरण शर्मा (त्यांच्या पतीचा पूजापाठचा व्यवसाय आहे) यांनी ही तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे की, २००७ मध्ये त्यांनी साईसागर स्वप्नसागर हाऊसिंग सोसायटी, विरार (पूर्व) येथे १२ लाखात बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. २० डिसेंबर २०१३ रोजी त्यांनी २२ लाखात आशिष जाधव यांना फ्लॅट विक्री केला. ही रक्कम त्यांनी बँकेमध्ये जमा केली होती. त्याच दरम्यान, धुमाळ पूरण शर्मांकडे पूजाअर्चेसाठी येत असत. त्यातून त्यांचा घनिष्ट परिचय झाला. 

मी माझा मित्र विक्रांत विजयकुमार वाघोले (रा. बीड बायपास रोड) सिडकोत सिटीए कमोडीटी ट्रेड आर्ट तृप्ती फायनान्स नावाने व्यवसाय करतो, असे त्यांनी शर्मा दांपत्याला सांिगतले. आमच्याकडे लोकांनी टक्के व्याजदाराने खूप रक्कम गुंतवली आहे. तुम्हीही त्याचा लाभ घ्या, असे सांगितले. तेव्हा शर्मांनी व्याजाने पैसे गुंतवणार नाही. आमच्याकडील पैसे हात उसने म्हणून देतो. तेच वाढवून द्या, असे म्हटले. धुमाळ, वाघोलेंनी तयारी दाखवल्यावर जुलै २०१५ ते डिसेंबर २०१५ दरम्यान त्यांना १९ लाख ५० हजार नगदी स्वरूपात दिले. 

महिन्याभरात वाढीव रक्कम मिळाले. पण मुदत संपल्यावरही प्रतिसाद मिळेना. म्हणून त्यांनी पाठपुरावा केल्यावर धुमाळ, वाघोलेंनीएचडीएफसी बँकेचे दोन चेक (अनुक्रमे लाख ८० हजार आणि ११ हजार ७० हजार) दिले. पण खात्यात रक्कमच नसल्याने ते परत आले. एक, दोन फेब्रुवारीला धुमाळ यांनी शर्मा यांच्या घरी जाऊन एक लाख रूपयांचा धनाकर्ष (डी.डी.) देऊन उर्वरित रक्कम विसरून जाण्याचे सांगितले. शिवाय बंदुकीचा धाक दाखवून पूरण शर्मांना शिवीगाळही केली. त्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...